जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, May 9, 2009

खजूर-आक्रोड़ रोल



जिन्नस

  • २५० ग्रॅम बिया काढलेला खजूर
  • २०० ग्रॅम अक्रोड गर
  • दोन चमचे रिकोटा चीज /खवा
  • एक चमचा साजूक तूप

मार्गदर्शन

खजुराचे बारीक तुकडे करावेत. अक्रोड ठेचून घ्यावेत. ( पूड करू नये. ) कढईत खजूर तूप टाकावे. आच मध्यम ठेवावी. खजूर मुळातच मऊ असल्याने दोन मिनिटांतच शिजतो. त्यात रिकोटा चीज/मावा घालून मिश्रण एकजीव करावे. दोन-तीन मिनिटे परतावे. मग तुकडे केलेले अक्रोड घालून सगळे जिन्नस एकमेकात व्यवस्थित एकत्र होईतो ढवळून ( चार मिनिटे ) उतरवावे. मिश्रण गरम असतानाच प्लॅस्टिक पेपर मध्ये गुंडाळावे रोल करावे. ( प्लॅस्टिकमुळे हात भाजत नाही ) थोडे कोमट झाले की फ्रीज मध्ये ठेवावे. दोन तासाने बाहेर काढून वड्या कापाव्या.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !