जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, May 16, 2009

प्रेमकहाणी भाग अंतिम

ही- खूप जुनी प्रेमकहाणी.

साऱ्यांनाच ती अज्ञात आहे. पण खरी आहे.

अजुनि ती वेस आहे.

तो अश्वत्थ आता आपल्या तरुण झालेल्या पानांनी कुजबुजतो आहे.

आणखी वेसीवरील रस्त्यातील धुळीत-

अजुनि ते भंगलेले विद्ध- हृदय. आजही हळूवार स्पंदणारं....तडफडणारं.

तिच्या मृदू-मुलायम आसुसल्या स्पर्शासाठी.

विद्ध राजगरुड मात्र त्यानंतर कधीच कोणाला दिसला नाही.

ऊरीपोटी फुटून बेभानपणे त्याने अवकाशात घेतलेली ती शेवटची झेप.

ती उत्तुंग झेप पाहणारा एकुलता एक साक्षीदार अश्वत्थ...........

अजुनि सळसळत तिथे उभा आहे. ती प्रेमकहाणी हळुवार जपत.

झेपेसोबतच पंखापंखातून व्यथितपणे स्वतःला विस्कटत गेलेला तो राजगरुड

त्याला आठवतो

अन् पानापानांतून तो उसासत राहतो.

उध्वस्त राजगरुडाने मात्र त्यानंतर कधीच सांगितले नाही आपले नाते __

पृथ्वीशी.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !